
तिवरे येथील वाघजाई मंदिरात लादीच्या कामाचे साहित्य चोरी करणाऱ्या चोरट्यांना अलोरे शिरगाव पोलीसानी शिताफीने पकडले
शिरगाव ( ता चिपळूण ):- चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील वाघजाई मंदिरात लादीच्या कामाचे 22000 रुपयांचे साहित्य चोरी करणाऱ्याना चोरट्यांना अलोरे शिरगाव पोलीस यांनी शिताफीने पकडल्याबद्दल अनेकांकडून कोतुक होत आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की तिवरे येथील वाघजाई मंदिरात चोखाब्याचे दगडी बसविण्याचे बांधकाम सुरू होते त्याठिकाणी लादीचे काम राजस्थान येथील कारगिर करीत होते त्यातील नीरज सेनी ( जयपूर ) व अजीम खान ( पुणे ) यांनी लादी बसविण्याच्या तीन मशीन व सिलेंडर व कारागीर प्रसाद पुजारी याचा मोबाईल असा जवळपास 22000 चा मुद्देमाल चोरून पुणे येथे प्रसार झाले होते याबाबत ठेकेदार घाशीराम गुजर ( खेर्डी ) यांनी अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली
त्यानुसार स पो नी संदीप पाटील यांनी पोलीस नाईक गगणेश पटेकर,पोलीस हवालदार कोळेकर, पोलीस हवालदार पाटील व पोलिस नाईक लालजी यादव यांचे पथक बनविण्यात आले आणि सदरच्या पथकाने तांत्रिक सोशधनाचा योग्य वापर करून पुणे येथून आरोपीच्या मुसक्या आवल्या आणि आरोपी निरज सेनी व अजीम खान याना मुद्देमालासह ताब्यात घेतले गुन्हाचा तपास तात्काळ लावल्याबद्दल शिरगाव पोलिस यांचे विशेष कोतुक होत आहे तर अधिक तपास पो हे कॉन्स्टेबल कोळकेर करीत आहेत
www.konkantoday.com