रत्नागिरी तालुक्यात तालुक्यातील पावस मेर्वी येथे बिबट्याने हल्ला केल्याने एक जण जखमी
रत्नागिरी तालुक्यात तालुक्यातील पावस मेर्वी येथे जांभुळभाटलेत बिबट्याने एकावर हल्ला केल्याची घटना शनिवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. गुरे चरवायला गेलेल्या जनार्धन काशिनाथ चंदूरकर ग्रामस्थावर बिबट्याने हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी रुग्णलयात दाखल केले.
पावस परिसरात यापूर्वी देखील बिबट्याने माणसांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. शनिवारी सकाळी पुन्हा बिबट्याने शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला केला.
सकाळी ते गावाजवळील जंगलात गुरे चरण्यासाठी गेले होते. गुरे चरवून परत येत असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली जनार्दन यांनी आपली सुटका करून घेतली त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
www.konkantoday.com