
एसटी महामंडळाने विजेवर धावणार्या १५० वातानुकू लित बसगाड्या निविदा प्रक्रियेतच अडकल्या
सुकर आणि पर्यावरणस्नेही प्रवासासह इंधनावरील खर्च आटोक्यात आणण्यासाठी एसटी महामंडळाने विजेवर धावणार्या १५० वातानुकू लित बसगाड्या आपल्या ताफ्यात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. परंतु दीड वर्ष होऊनही या बस निविदा प्रक्रियेतच अडकल्या आहेत. भाडेतत्वावर घेण्यात येणाºया या गाड्या मुंबई ते पुणे अशा कमी अंतरासाठी चालवण्याचा विचार केला जात आहे. केंद्र सरकारने विजेवर धावणाºया बसेसना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एसटीकडून भाडेतत्त्वावरील वातानुकूलित बस सेवेत दाखल केल्या जाणार आहेत. यासाठी जुलै २०१९ मध्ये निविदा काढली. या निविदेला प्रतिसाद देत एका कं पनीने ५० बस देण्याची तयारी दर्शवली. परंतु निविदेतील काही अटी व शर्ती बदलण्याची मागणी सदर कंपनीने केली आहे
www.konkantoday.com