पालकमंत्री अनिल परब यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सुधारण्याचे आव्हान स्वीकारावेः समविचारी मंचचे आवाहन
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री जेमतेम साडेचार वेळा रत्नागिरी दौऱ्यावर आले.आज दुरदर्शनवर त्यांचे दर्शन झाले.कंगना या अभिनेत्रीवर ते बोलत होते अर्थात त्यांनी कुणाविषयी काय बोलावे हा त्यांचा प्रश्न आहे.तरीही जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची चिंता पालकमंत्री म्हणून त्यांना नसावी याचे आश्चर्य वाटते असे महाराष्ट्र समविचारी मंचच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
जे खाते परब संभाळतात त्या एस.टी.च्या कर्मचाऱ्यांना मागील चार महिने पगार नाही.जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत अनेक रिक्तपदे असल्याने रुग्णसेवेत अडथळा येत आहे.अती दक्षता विभागातील जोखीम स्वीकारुन काम करणाऱ्या परिचारिका,वॉर्डबॉय यांना कोरोना प्रादुर्भाव होत आहे.नुकताच या विभागातील एका परिचारिकेला रात्रपाळी करीत असताना कोरोना झाल्याचे निदर्शनास आले.पालकमंत्री या नात्याने तुम्ही या वा येऊ नका आम्हांला त्याचे काही देणघेणं नाही.पण वाढत्या संख्येने कोरोना असलेल्या कोरोना रुग्णांना आणि अपुऱ्या संख्येने असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होण्यासाठी प्रयत्न करावा इतकीच आमची अपेक्षा आहे असे समविचारी मंचचे पदाधिकारी सर्वस्वी राज्य महासचिव श्रीनिवास दळवी, राज्य सरचिटणीस संजय पुनसकर, युवा प्रमुख, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर, सिंधुदुर्गचे अध्यक्ष भानुदास आजगांवकर, राज्य महिला समन्वयक राधिका जोगळेकर,राज्य संघटक स्मिता कुलकर्णी आदींनी म्हटले आहे.
www.konkantoday.com