न्यायालयाचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणतीही कारवाई रेशन दुकानदारांवर करू नये, संघटनेची मागणी
रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक- मालक संघटनेने रेशन दुकानदारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी १ सप्टेंबर पासून धान्य वितरण न करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर जिल्हा पुरवठा प्रशासनाने रेशन दुकानदारांवर कारवाई केली जाईल असा इशारा लेखी पत्राद्वारे दिल्यानंतर संघटनेने देखील या पत्राला चोखपणे उत्तर देताना आमच्या मागण्यांसंदर्भात राज्य फेडरेशन मार्फत व जिल्हा संघटनेमार्फत शासनस्तरावर व जिल्हा पुरवठा विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. तसेच नागपूर खंडपीठ व मुंबई उच्च न्यायालयात रीट पिटिशन दाखल करण्यात आली आहे. यामुळे न्यायालयाचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणतीही कारवाई रेशन दुकानदारांवर करू नये, अशी मागणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
www.konkantoday.com