देशात सर्वाधिक गंभीर परिस्थिती ही पुण्यात -केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर
देशात सर्वाधिक गंभीर परिस्थिती ही पुण्यात आहे.अस मत केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलं आहे.पुण्यातील कोरोनाच्या गंभीर स्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी आज पुण्यात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत विधान भवन येथे विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी विभागीय स्तरावरचा कोरोना स्थितीची सादरीकरण केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासमोर सादर केले. यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात टेस्टिंग वाढविण्याच्या सूचना केल्या.
www.konkantoday.com