
जिल्ह्यात कोरोनाचा जोर, आज जिल्ह्यात २०७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले, १०६ रुग्णांची कोरोना वर मात तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना जोर पकडू लागला आहे आजच्या अहवालात रत्नागिरी चिपळून खेड संगमेश्वर गुहागर आदी भागात मोठ्या प्रमाणावर करोना रुग्ण सापडले आहेत आज जिल्ह्यात २०७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत
रत्नागिरी तालुक्यात आज चौपन्न कोरोना बाधित रुग्ण सापडले आज जिल्ह्यात १०६ रूग्णांनी कोरोना वर मात केली तर उपचाराच्या दरम्यान आज खेड येथील एकाचा मृत्यू झाला प्रशासनाने व आरोग्य विभागाने अनेक तालुक्यात बाजारपेठेत कोरोनाच्या टेस्ट सुरु केल्या आहेत त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण वाढत आहे यामध्ये व्यापारी व्यावसायिक यांचाही समावेश आहे
यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४७३६वर पोहोचली आहे. आजपर्यंत २ हजार ९७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली
तपशिल पुढीलप्रमाणे (आरटीपीसीआर)
गुहागर १३
चिपळूण २
रत्नागिरी २१
लांजा ५
खेड १३
संगमेश्वर ४४
राजापूर ९
एकूण १०७
रॅपिड अँटीजेन टेस्ट
संगमेश्वर ३
खेड १९
गुहागर १३
चिपळूण २८
रत्नागिरी ३३
लांजा ४
एकूण १००
www.konkantoday.com