
खाजगी रूग्णालयांच्या नवीन दरपत्रकाला इंडियन मेडिकल असोसिएशनकडून विरोध
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत महाराष्ट्र शासनाने ३१ रूग्णालयांसाठी नवे दरपत्रक जाहीर केले आहे. मात्र हा निर्णय मुंबईत कॉर्पोरेट रूग्णांसाठी फायदेशीर तर छोट्या व मध्यम रूग्णालयांवर अन्याय करणारा असल्याचा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशनने केला आहे. या संदर्भात लवकरच राज्यातील २१६ शाखांच्या डॉक्टरांनी बैठक घेवून कामकाजाची भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे व मानद राज्य सचिव डॉ. पंकज बंदरकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली आहे.
www.konkantoday.com