कांचन डिजिटल पुरस्कृत गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न
रत्नागिरी- रत्नागिरी येथील कांचन डिजिटल फोटो रत्नागिरी चे मालक, प्रसिद्ध फोटोग्राफर कांचन मालगुंडकर यांनी यंदा गणपती सजावट स्पर्धा आयोजित केली होती.या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.वॉटसपच्या माध्यमातून ही स्पर्धा घेण्यात आली. यास्पर्धेतील परिक्षण अभिजित नांदगावकर ,पुणे यांनी केले.अतिशय कस लावुन यांचे परिक्षण करण्यात आले.यातून दुसरे व तिसरे बक्षीस विभागून देण्यात आले.
मारुती मंदिर येथील व्यंकटेश पॅरेडाईज हॉल मध्ये या समारंभाला प्रसिद्ध उद्योजक प्रसन्न आंबुलकर,भंडारी समाजाचे नेते राजीवजी कीर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, निवेदन शकील गवाणकर यांनी केले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे…
पहिले बक्षीस:
श्रीकांत पाडावे [मिरजोळे] रोख रू 5000/-व आकर्षक सन्मानचिन्ह
दुसरे बक्षीस विभागून…
1: संजय वर्तक( कुवारबाव) रोख रु 1500/- व आकर्षक सन्मानचिन्ह
2: विशाल विकास मयेकर (मुरुगवाडा) रोख रू 1500/- व आकर्षक सन्मानचिन्ह
तिसरे बक्षीस विभागून….
1: अनिल लक्ष्मण
गोताड( कोतवडे)रोख रू 1000/- व आकर्षक सन्मानचिन्ह
2: रजनीश रामजी वासावे (गावडे आंबेरे) रोख रू 1000/- व आकर्षक सन्मानचिन्ह
खास आकर्षक मूर्ती
1: प्रणय सुर्वे (जुवे)
मूर्तिकार : दीपक चव्हाण (जुवे)
उत्तेजनार्थ बक्षीस
1: संजीत अजय गांधी
2: रवींद्र मालगुंडकर
3: अजय प्रकाश पारकर
4: योगेश सखाराम हरमले
5: विनोद गोविंद जोशी
6: सदानंद मयेकर
7: संतोष श्रीधर शिवलकर
सर्व विजेत्यांना आकर्षक सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
प्रसिद्ध उद्योजक प्रसन्न आंबुलकर, यांनी अशा प्रकारे कार्यक्रम घेवून कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे काम सातत्याने कांचन मालगुंडकर हे करीत असल्याने त्यांनी कौतुक केले. राजीव कीर यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आणि आयोजक कांचन मालगुंडकर यांनी अशा प्रकारे आयोजित केलेल्या स्पर्धेची प्रशंसा केली. सातत्याने विविध प्रकारचे अशा स्पर्धा आयोजित करणा-या कांचन मालगुंडकर यांना शुभेच्छा देत आपण नेहमी अशा कार्यक्रमांना सहकार्य करु असे अभिवचन दिले.
कांचन मालगुंडकर यांनी ही सर्व स्पर्धकांनी जे सहकार्य केले त्यांचे आभार मानून कोरोना कालावधीत हा कार्यक्रम शासकीय नियमानुसार सोशल डिस्टंशिंग ठेवून साजरा केला ,अशा प्रकारे आपण विविध अनोख्या स्वरूपाच्या स्पर्धा भविष्यात आयोजित करुन असे सांगून मान्यवर,परिक्षक यांचे आभार मानले.
www.konkantoday.com