
मुंबई एमएमआर पुणे आणि नाशिकमधील विकासकांनी स्टँप ड्युटी ग्राहकांना माफ करून हा बोजा स्वत: उचलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला
कोरोनाच्या संकटानंतर रियल इस्टेट क्षेत्र पुन्हा एकदा भरारी घेण्यासाठी सज्ज आहे. नरेडको महाराष्ट्रमधील सदस्यांनी एकत्र येत हजारो निवासी प्रकल्पामधील परवडणारी, भव्य निवासी घरे उपलब्ध केली आहेत.मुंबई एमएमआर पुणे आणि नाशिकमधील बहुतांश विकासकांनी स्टँप ड्युटी माफ करून हा बोजा स्वत: उचलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असून गृह खरेदीदारांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.
राज्य सरकारने नुकतीच रियल इस्टेटला बळकटी देण्यासाठी 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2020 या काळात घर घेतल्यास तीन टक्क्यांनी स्टँप ड्युटी माफ आणि 1 जानेवारी 2021 ते 31 मार्च 2021 या काळात घर घेतल्यास स्टँप ड्युटी दोन टक्क्यांनी कमी करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. या दिशेने आणखी महत्त्वपूर्ण पाऊल नरेडकोने उचलले आहे. इतरही काही विकासक येत्या काळात या मोहिमेत सामील होतील, असा अंदाज आहे.
www.konkantoday.com