
जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या मानाने वैद्यकीय सुविधांची वाढ अधिक प्रमाणात होणे गरजेचेः समविचारी मंच
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने चार हजारचा पल्ला ओलांडला आहे.दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे.जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कमी कर्मचारी संख्या असूनही शर्तीने जीवाचे रान करुन रुग्णसेवा देत आहेत.तरीही आवश्यक औषधोपचार आणि दाखल रुग्णांना जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी,परिचारिका,तत्सम कुशल तंत्रज्ञ यांच्या अभावी केवळ दाखल होऊन समाधान मानावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे.
महाराष्ट्र समविचारी मंचचे पदाधिकारी सर्वस्वी प्रांतिक सरचिटणीस संजय पुनसकर,महासचिव श्रीनिवास दळवी,जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर,युवा आघाडी प्रमुख निलेश आखाडे, आदींनी १५ अॉगष्ट्र पासून ‘आरोग्य अभियान जनजागरण’ अंतर्गत या विषयी माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.तेव्हा त्या त्या भागातील नागरिकांनी, तेथील सामाजिक कार्यकर्त्यांनी, शक्य ती माहिती देण्याचा प्रयत्न केला.
जिल्ह्यातील दापोली, कळंबणी,कामथे,सह अनेक कोव्हिड रुग्णालयात जिल्हा आरोग्य प्रशासन व वरिष्ठ अधिकारी फिरकले नसल्याने स्थानिक गैरसोयी पुढे आल्या नाहीत असे सांगितले. जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी कुठे आहेत ? या महामारीच्या काळात त्यांनी काय केले ? प्राथमिक आरोग्य केंद्रे ही नावापुरती असून ग्रामीण जनतेची परवड सुरुच आहे.जिल्हा प्रशासन जिल्हा आरोग्य प्रशासनचे प्रथम श्रेणीचे अधिकारी यांनी याबाबत किती पहाणी केली आणि भेटी दिल्या याविषयी अनेकांनी समविचारींकडे नाराजी व्यक्त केली.
जिल्ह्यात कोव्हिड रुग्णालय जाहीर झाली पण इतर आवश्यक साधन सुविधा यांचा मेळ साधण्यात आला नाही.कोरोना काळात झालेल्या खर्चाची पडताळणी करण्याची मागणीही तालुका स्तरावर होत आहे.
जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी हजर झाल्या पण कोरोनाच्या पाश्वभूमीवर त्यांनी घेतलेली भुमिका कोठेही दृष्टीपथास आली नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे.संपूर्ण प्रशासन प्रसिद्धी माध्यम केंद्र बनले असून रुग्णांची होत असलेली परवड कुणाही लोकप्रतिनिधींना दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
उत्तम परिपूर्ण आरोग्य व्यवस्था हा आमचा अधिकार आहे.जिल्ह्यातील रुग्णालयातील रिक्तपदे भरण्यासाठी जे लोकप्रतिनिधी प्रयत्न करतील त्यांना मानवंदना दिली जाईल.सामान्य जनता संभ्रमित झाली आहे.जिल्हा परिषदेत औषधे खरेदी झाली त्यांचा लेखाजोगा जाहीर करावा. असेही मत अनेकांनी मांडले आहे.स्वँब चाचणी मशीन नवीन घेण्यात आले आहे.नवीन मशीन मध्यंतरात वारंवार बंद पडणे हे धोकादायक आहे.यासाठी या मशीन खरेदीचा सविस्तर तपशील समविचारींनी प्राप्त करावा असेही काहींनी सुचविले आहे.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील जे कर्मचारी कोरोना रुग्णांच्या आरोग्यासाठी जीवाच्या आकांताने राबत आहेत ते नाउमेद न होता आरोग्य यंत्रणेतील जी रिक्तपदे आहेत ती भरण्यासाठी प्रयत्न करावेत असे समविचारींनी ठरविले असल्याचे या संघटनेचे राज्य सरचिटणीस संजय पुनसकर यांनी सांगितले तर राज्य युवा आघाडीचे प्रमुख निलेश आखाडे यांनी आमचा मुख्य हेतू जिल्हा आरोग्य यंत्रणा लोकाभिमुख व्हावी हा आहे. आजवर गेल्या पंधरा वर्षात अनेक लोकप्रतिनिधिंनी केवळ आश्वासने दिली त्याची पुर्तता केली नाही. दुर्दैवाने कोरोना काळात आरोग्य कर्मचारी निकड पुढे आली त्यामुळे सामान्य माणूसही या प्रश्नावर जागृत झाला आहे. आरोग्य हा आमचा अधिकार आहे. तो मिळविणे त्यासाठी सनदशील मार्गाने प्रयत्न करणे हे तमाम नागरिकांचे कर्तव्य आहे. आरोग्य यंत्रणेतील दुर्लक्षित प्रश्न सामान्य लोक समविचारीकडे देत आहेत.त्या प्रश्नांवर तमाम नागरिकांना सामाऊन घेऊन गरजेनुसार आंदोलने केली जातील असे जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर यांनी सांगितले.
आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी दूर करुन रुग्णांना कोल्हापूर पुणा मुंबईत जावे लागणार नाही यासाठी शासन स्तरावर प्रयत्न व्हावे ही समविचारी मंचची मागणी सामान्य नागरिकांना पटल्याने सामाजिक स्तरावरील अनेक पदाधिकारी स्वतःहून या लढ्यात सामील होत असल्याचे मंचचे राज्य महासचिव श्रीनिवास दळवी यांनी सांगितले.
,www.konkantoday.com