
कोविडसाठी राज्य व केंद्र शासनाने नेमका किती निधी दिला, तो कुठे खर्च झाला, याची माहिती जिल्हाधिकारी यांनी जाहीर करावी भारतीय जनता युवा मोर्चाची मागणी
रत्नागिरी जिल्हा रुग्णालयासाठी आयसीयू अॅम्ब्युलन्सची सुविधा अत्यावश्यक आहे. कोविडग्रस्त रुग्ण नक्की कसा आहे, याची माहिती देणारे बुलेटिन किंवा संबंधित नातेवाइकांना माहिती देण्याकरिता हेल्पलाइनची गरज आहे. यापूर्वीही हेल्पलाइनची मागणी केली होती. हेल्पलाईन सुरू न झाल्यास भारतीय जनता युवा मोर्चातर्फे जिल्हा रुग्णालयातून हेल्पलाइन चालू करू, अशी ग्वाही दक्षिण रत्नागिरी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी दिली.कोविड काळात भाजपने मोठ्या प्रमाणात सेवाकार्य केले आहे. कोविडसाठी राज्य व केंद्र शासनाने नेमका किती निधी दिला, तो कुठे खर्च झाला, याची माहिती जिल्हाधिकार्यांहनी जाहीर करावी. आमदार प्रसाद लाड यांनी १० लाख रुपयांचा निधी जिल्हा रुग्णालयाकडे वर्ग केला. तो कुठे खर्च केला, याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी जाहीर करावी, अशी मागणीही पटवर्धन यांनी केली.
अत्यावश्यक सेवेसाठी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका जिल्ह्याबाहेर नेण्यास परवानगी नाही. ती मिळण्याकरिता मंत्री उदय सामंत यांनी निर्णय करावा. पुन्हा लॉकडाउन होणार की नाही, या द्विधा मनःस्थितीमध्ये रत्नागिरीकर आहेत. याबाबत नेमका काय निर्णय होणार, याची माहिती जिल्हाधिकारी किंवा मंत्री सामंत यांनी जाहीर केली पाहिजे.
www.konkantoday.com