
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची वैष्णवी जोशी हिला शास्त्रीय गीतगायन स्पर्धेत मुंबई विद्यापीठात रौप्य पदक
मुंबई विदयापीठाच्या 54 व्या आंतर महाविदयालयीन युवा महोत्सवामध्ये गोगटे-जोगळेकर महाविदयालयाच्या वैष्णवी जोशी हि शास्त्रीय गीतगायन स्पर्धेत मुंबई विदयापीठामध्ये रौप्यपदक प्राप्त केले आहे. माजी विद्यार्थी ओंकार बंडबे यांनी शास्त्रीय गीतगायनासाठी मार्गदर्शन केले. तसेच तीला वरद जोशी यांनी तबला वादनास व चैतन्य पटवर्धन हार्मोनियम साथ दिलेली. सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. आनंद आंबेकर आणि प्राध्यापक शुभम पांचाळ यांचे बहुमुल्य सहकार्य लाभले.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुलदत्त कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर कला शाखेचे उपप्राचार्य डॉ.सुरेंद्र ठाकुरदेसाई वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्य डॉ.यास्मिन आवटे विज्ञान उपप्राचार्य डॉ.अपर्णा कुलकर्णी या सर्वांनी वैष्णवी जोशी हिच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.