१ ते १५ ऑक्टोबर दरम्यान सीईटी परीक्षा घेण्यात येणार

कोरोना संकटामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या सीईटी परीक्षेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. महाराष्ट्रात सीईटी ऑक्टोबर महिन्यात घेतली जाणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
१ ते १५ ऑक्टोबर दरम्यान सीईटी घेण्यात येणार असून लवकरच सुधारित वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभाग सीईटी सेल मार्फत विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) घेतली जाते. दरवर्षी साधारणतः मे महिन्यात सीईटी होते.
मात्र यावर्षी कोरोनामुळे परीक्षा अद्याप होऊ शकलेली नाही.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button