
राष्ट्रीय महामार्गाची दुरूस्ती न केल्यास शिवसेनेतर्फे रास्ता रोको- सचिन कदम
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील श्रीक्षेत्र परशुराम ते आरवली दरम्यानच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरावस्था झाली आहे. चार दिवसात राष्ट्रीय महामार्गाची दुरूस्ती न केल्यास रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी दिला आहे. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता एस. टी. शेख यांना निवेदन देवून सदरचा इशारा दिला आहे.
www.konkantoday.com