
शिवसेना-भाजपला महाविकास आघाडी देणार ’टक्कर’ देण्याच्या तयारीत, नगराध्यक्ष आघाडीचाच होणार
खेड नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार) गटातील महायुतीचा तिढा कायम असतानाच उबाठा-कॉंग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार गट) महाविकास आघाडीत मनसेही सामील झाली आहे. शिवसेना-भाजपला टक्कर देण्याची रणनीती महाविकास आघाडीने आखली आहे. नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचाच नगराध्यक्ष विराजमान होईल, असा विश्वासही आघाडीतील पदाधिकार्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
न. प. निवडणुकीची धामधूम सुरू असली तरी अजूनही महायुतीचे त्रांगडे कायमच आहे. भाजपवासी झालेल्या वैभव खेडेकर यांनी शिवसेनेशी हातमिळवणी न करता स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका घेतली आहे. नगराध्यक्ष पदासाठी वैभवी खेडेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तबही केले आहे. यामुळे महायुतीचा पेच कायम असून अंतिम निर्णयाचा चेंडू महायुतीतील तीनही वरिष्ठ नेत्यांच्या कोर्टात गेला आहे.www.konkantoday.com




