रत्नागिरी जिल्ह्याला कोरोनाचा विळखाआज जिल्ह्यात १७३ कोरोना पॉझिटिव्ह सापडले, असून दोन जणांचा मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्याला कोरोनाचा विळखा वाढत आहे.आज जिल्ह्यात १७३ कोरोना पॉझिटिव्ह सापडले, असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे
काल बुधवारी १४२ कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी १७३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. रत्नागिरी तालुक्या बरोबर चिपळून खेड तालुक्यातही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत त्यामुळे एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या चार हजार ३७२वर पोहोचली आहे. आज ४९ रुग्ण बरे झाले तर आतापर्यंत २८८३ रुग्ण बरे झाले आहेत. आज रत्नागिरीतील ७० वर्षे व मंडणगडमधील ६० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला.
तपशिल पुढीलप्रमाणे (आरटीपीसीआर)
दापोली १
खेड २
चिपळूण १७
संगमेश्वर ७
रत्नागिरी २५
लांजा ८
एकूण ६०
रॅपिड अँटीजेन टेस्ट
दापोली १
खेड ५२
गुहागर ५
चिपळूण २३
रत्नागिरी २३
लांजा ९
एकूण ११३
www.konkantoday.com