
कोरोना व्हायरसमुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे
कोरोना व्हायरसमुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्याच्या शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. दहावी आणि बारावीच्या मुख्य परीक्षेत एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांची दरवर्षी ऑक्टोबरमध्ये परीक्षा होते. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
पुढे ढकलण्यात आलेल्या या परीक्षा नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यावेळी कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन दहावी-बारावीच्या एटीकेटीच्या परीक्षांचा निर्णय घेण्यात येणार आहे.
www.konkantoday.com