कोरोना कालावधीत जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या अंशकालीन स्त्री परिचर मानधनापासून वंचित
कोरोना कालावधीत आरोग्य विभागातील प्रत्येक जण स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहे. त्यामध्ये अंशकालीन स्त्री परिचर जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. मात्र मार्च २०२० पासून जिल्ह्यातील ३८० अंशकालीन स्त्री परिचर कोरोना मानधन तर जून ते ऑगस्टपासून नियमित मानधनाशिवाय सेवा बजावत आहेत. राज्य सरकार आरोग्य विभागातील कर्मचार्यांना काही कमी पडू देऊ नका अशी घोषणा करीत आहे. मात्र प्रत्यक्ष सेवा बजावणारे कर्मचारी मानधनापासून वंचित आहेत. अशी स्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या लढाईत जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य उपकेंद्रात स्त्री परिचर कार्यरत आहेत. आरोग्य सेविकांसोबत या अंशकालीन स्त्री परिचर कोरोना प्रतिबंधाच्या मोहिमेत ग्रामीण स्तरावर काम करत आहेत. पण त्याना दिल्या जाणार्या मानधनासाठी अजूनही आरोग्य विभागस्तरावरून कार्यवाही झालेली नसल्याचे संघटनेच्या अध्यक्षा मनाली कांबळे यांनी सांगितले.
www.konkantoday.com