लवेल येथील घरडा महाविद्यालयाच्या वसतिगृहात पेड कोविड सेंटर सुरू,अत्यल्प दरामध्ये होणार कोरोना बाधितांवर उपचार

खेड : खेड तालुक्यातील लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये सुरु करण्यात आलेल्या घरडा हॉस्पिटल संचलित पेड कोविड केअर सेंटरचे तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांच्या हस्ते उदघाटन झाले. या कोविड सेंटरमध्ये अत्यल्प दरात कोरोना रुग्णांवर उपचार केले जाणार असल्याची माहिती यावेळी घरडा हॉस्पिटलच्या वतीने देण्यात आली.
तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. शासकीय रुग्णलयात या रुग्णावर उपचार केले जात आहेत मात्र वाढती रुग्ण संख्या लक्षात घेत कोरोना बाधित रुग्णांवर तात्काळ आणि चांगले उपचार व्हावेत यासाठी तालुक्यात आता पेड कोविड सेंटरची आता निर्मिती केली जात आहे. या आधी लोटे येथील हॉटेल वक्रतुंड येथे पेड कोरोना रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत आता सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या घरडा कंपनी आणि बाई रतन बाई धर्मादाय हॉस्पिटलने दहा स्वतंत्र खोल्यांमध्ये ऑक्सिजन बेड असलेले पेड कोविड केअर सेंटर सुरू केले आहे.
घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात हे पेड कोविड सेंटर सुरु करण्यात आले असून या सेंटरमुळे तालुक्यातील रुग्णांवर आता जलद आणि सुलभरित्या उपचार करणे शक्य होणार आहे. खेडच्या तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी या कोविड सेंटरचे उदघाटन केल्यानंतर संपूर्ण सेंटरची पाहणी करून समाधान व्यक्त केले. या पेड कोविड सेंटरमध्ये चोवीस तास एमडी फिजिशियन व संपूर्ण मेडिकल स्टाफ रुग्णांच्या सेवेसाठी उपस्थित असणार आहे. विशेष म्हणजे पुरुष आणि स्त्रियांसाठी वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. या सेंटरमध्ये सिटी स्कॅन, एक्सरे यासारख्या सर्व सुविधा उपलब्ध असून कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक असणारी सर्व औषधे देखील कोविड सेंटर मध्ये उपलब्ध करण्यात आली आहेत.
या कोविड सेंटरच्या उदघाटन प्रसंगी घरडा कंपनीचे शिवम सोनी व्यवस्थापकीय अधिकारी श्री. भोसले, कुलकर्णी, यांच्यासह सर्व डॉक्टर्स, मेडिकल स्टाफ उपस्थित होता. तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी तालुक्यातील रुग्णांनी अर्थात ज्यांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यायचा असेल त्यांनी या कोविड सेंटरचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button