
रेडीरेकनरच्या दरात दहा टक्के कपात होण्याची शक्यता
घरांचे बाजारभाव निश्चित करणार्या शीघ्रगणकाच्या (रेडीरेकनर) दरात दहा टक्के कपात करण्याबरोबरच सर्व दरात सुसूत्रता आणण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. पुढील मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचे निर्णय होण्याची शक्यता आहे.
मुद्रांक शुल्कात तीन ते दोन टक्के सूट देणार्या राज्य शासनाने रेडीरेकनरचे दरही कमी करावेत अशी विकासकांची प्रमुख मागणी आहे. २५ टक्क्यांपर्यंत ते कमी करण्यात यावे असे या विकासकांचे म्हणणे आहे. प्राप्तीकर कायद्यात असलेल्या तरतुदीनुसारच राज्यातील रेडीरेकनरचे दर निश्चित करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाने दिल्याचे कळते. रेडीरेकनरचे नवे दर एप्रिलपासून लागू होणार होते परंतु कोरोनामुळे हे दर कायम ठेवण्यात आले. ऑगस्ट वा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात नवे दर लागू होण्याची शक्यता होती.
www.konkantoday.com