भा.ज.पा. दक्षिण रत्नागिरीच्या कोरोना लॉकडाऊन मधील सेवा व मदत कार्याच्या अहवालाच्या ‘प्रचिती’ या ई-बुकचे जिल्हाध्यक्षांच्या हस्ते प्रकाशन.
भा.ज.पा.ने कोरोना लॉकडाऊन कालावधीत संघटनेला सतर्क करत राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे.पी.नड्डा साहेब, प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील साहेब यांच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करत अडचणीत सापडलेल्या नागरिकांना मदतीचा हात देऊ केला. शिधावाटप, अन्नपदार्थांचे वितरण, मास्क, सॅनिटायझरचे वितरण, रक्तदान, भाजीपाला वाटप, विविध घरपोच सेवा अशाविविध उपक्रमांतून समाजमित्र म्हणून भा.ज.पा. कार्यकर्त्यांनी काम केले. प्रदेश भा.ज.पा.ने 50 हजार व्यक्तींपर्यंत पोहोचण्याचे उद्दीष्ट रत्नागिरी दक्षिण भा.ज.पा.ला दिले होते. प्रत्यक्षात 63,000 व्यक्तींपर्यंत विविध सेवा घेऊन भा.ज.पा. कार्यकर्ते पोहोचले. भा.ज.पा. रत्नागिरीने जनतेच्या निकट जात हे सेवा कार्य केले. कोरोना लॉकडाऊन मध्ये अडचणीत सापडलेल्या नागरिकांसाठी जे काम करत आले ते केल्याने भा.ज.पा.चे कार्यकर्ते आनंदी झाले. संघटनात्मक, रचनात्मक कामाचा आनंद कार्यकर्त्यांनी घेतला आणि गरजूंना मदतही झाली. या सेवा कार्यातून भविष्यात नव्या कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून हे सेवाकार्य ई-बुकच्या माध्यमातून प्रकाशित करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार ‘प्रचिती’ नावाचे ई-बुक आता प्रकाशित करीत आहोत. कोरोना लॉकडाऊन कालावधीत केलेल्या मदत व सेवा कार्याचे फोटो या ई-बुक मध्ये समाविष्ट आहेत. केलेल्या कामाचे ई-बुकच्या माध्यमातून प्रकाशन केल्याने कार्यकर्त्यांनी केलेले काम नजरेसमोर राहील. नव्या भा.ज.पा.च्या जडणघडणीत प्रचिती ई-बुक प्रेरणादायी ठरेल, असे ॲड. दीपक पटवर्धन म्हणाले.
प्रकाशन समारंभाला श्री.सचिन करमरकर शहराध्यक्ष, श्री.राजेश सावंत जिल्हा सरचिटणीस, श्री.अनिकेत पटवर्धन युवा मोर्चा अध्यक्ष, ॲड. अशोक कदम जिल्हा उपाध्यक्ष, ॲड. महेंद्र मांडवकर जिल्हा चिटणीस, श्री.भाई जठार, सौ.ऐश्वर्या जठार सौ.शिल्पा मराठे, श्री.शैलेश लक्ष्मण बेर्डे, श्री.विजय लक्ष्मण सालिम, श्री.संदीप प्रभाकर सुर्वे, श्री.प्रवीण देसाई, श्री.संकेत बापट, श्री.विक्रम जैन श्री.रामदास शेलटकर यांचेसह अनेक भा.ज.पा. पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
www.konkantoday.com