जिल्ह्यातील ३७९ ग्रामपंचायतींचा कारभार अधिकारी प्रशासकांच्या हाती
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या सुधारित परिपत्रकानुसार जिल्ह्यातील ३७९ ग्रामपंचायतींचा कारभार शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी असलेल्या प्रशासकाच्या हाती सोपविण्यात आला आहे.
ग्रामविकास विभागाने पहिल्या टप्प्यात विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकार्यांकडे प्रशासक पदासह ग्रामपंचायतीची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला होता. सदरच्या वादग्रस्त निर्णयाला सर्व स्तरातून विरोध होताच अधिकार्यांकडे ग्रामपंचायतीच्या प्रशासक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
www.konkantoday.com