दोन जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अपघात करून फरारी झालेल्या डंपर चालकाला अखेर अटक.

मिऱ्या नागपूर राष्ट्रीय महामार्गावर काल तारीख १९ रोजी सकाळी दुचाकी वरील दोघांना धडक देऊन फरार झालेल्या डंपर चालकाचा शोध लागत नसल्याने नाणिज, पाली, खानू, बांबर, हातखंबा, निवळी परिसरातील शेकडो ग्रामस्थ या दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या फरार चालकासहित डंपरचा शोध घेण्यासाठी दिवसभर प्रयत्न करत होते चालकास अखेर ग्रामस्थांच्या रेट्यामुळे पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली आहे.अखेरीस ग्रामस्थांच्या लढ्याला त्याला यश येऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याने ग्रामस्थ शांत झाले.या अपघाताबाबत पाली पोलीस दूर क्षेत्रातून मिळालेली माहिती अशी की, १९ रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान मिऱ्या नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून वेल्डिंगच्या कामासाठी पालीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकी (क्र. एम एच ०८ ए एम ४९०३) वरील दोघांना नानिज जुना मठ येथे पाठीमागून येणाऱ्या डंपर ने धडक देऊन त्याच्यावरील चालक डंपर सहित फरार झाला होता या धडकेत दुचाकी वरील अरुण अनंत दर्डी (३५), रामचंद्र देवजी दरडी(६५, रा. दरडीवाडी नाणीज) हे गंभीर जखमी होऊन मयत झाले होते. या अपघातानंतर दिवसभर या महामार्गावरील नाणिज, पाली, हातखंबा, खेडशी यासह विविध ठिकाणांच्या सीसीटीव्ही चे फुटेज ग्रामस्थ,पोलीस अज्ञात डंपरचा शोध लागण्यासाठी तपासात होते अखेरीस रात्री त्या डंपर (क्र. एम एच २० इ एल ८११४) डंपर सहित त्याचा चालक लीलाधरी महादेव सॉ ( 20 रा. रोहनियातंड झुमरीतलया, जि. कोडरमा, राज्य झारखंड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button