भर रस्त्यात खोदाई केल्याने नागरिकांना त्रास, नपच्या चुकीच्या नियोजनामुळे नागरिकांना दंडाचा फटका, भाजपा उद्योग आघाडी तर्फे निवेदन
रत्नागिरी नगर परिषदेने शहरातील नळपाणी योजनेसाठी खोदाई सुरू केली आहे पाणी योजनेसाठी खोदाई असल्याने ही गोष्ट आवश्यक असली तरी हे चर व्यवस्थित बुजवले जात नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे याबाबत भारतीय जनता पक्षाच्या उद्योग आघाडीचे जिल्हा संयोजक मुकुंदराव जोशी व एडवोकेट मनोर दळी यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना आज निवेदन दिले आहे शहरातील मारुती मंदिर सर्कल मध्ये खोदाई करून पाईपलाईन घातल्यानंतर हे चर व्यवस्थित बुजवले जात नाही या ठिकाणी मातीचा ढीग झाला आहे त्यामुळे समोरील दुकानात जाण्यासाठी नागरिकांना मोठी समस्या होत आहे पाईपलाईन साठी चर गटारा पासून रस्त्याच्या आतील भागात खोदण्यात आल्यामुळे वाहतुकीला अर्धा रस्ताच मिळत आहे व हेच चर व्यवस्थित न बुजवलेल्या ने दुकानात जाण्यासाठी वाहने उभी केल्यावर वाहतूक पोलीस तात्काळ फोटो काढून वाहनचालकांवर दंडाची कारवाई करतात नगरपरिषदेच्या चुकीच्या नियोजनामुळे नागरिकांना नाहक दंड होत आहे यामुळे नगरपरिषदेने तात्काळ हे. चर बुजवून सपाटीकरण करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे तसेच निवेदनाची प्रत वाहतूक पोलिसांनाही देण्यात आली आहे रस्ता पूर्ववत होईपर्यंत तारतम्य बाळगून दंडाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे
www.konkantoday.com