
थांबला विश्वाचा पसारा, हे विघ्नहर्ता, सावराया द्या बळ’, रांगोळीकार राहुल कळबंटे यांची आणखी एक अप्रतिम कलाकृती
कोरोनामुळे केला लॉकडाऊन, सुखी संसाराला लागली झळ, थांबला विश्वाचा पसारा, हे विघ्नहर्ता, सावराया द्या बळ’ अशी गणरायाकडे प्रार्थना करणाऱ्याहातावर पोट असणार्या कष्टकरी जोडप्याला गणेश आशिर्वाद देत असल्याची रांगोळी रत्नागिरी मालगुंड येथील प्रसिद्ध रांगोळीकार राहुल कळबंटे यांनी साकारली आहे सध्याच्या कोरोनाच्या महामारी मुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या हातावर पोट असलेल्या यांचे हाल होत आहेत एकीकडे महामारी ची भिती तर दुसरीकडे खायचे काय हा त्यांच्यासमोर प्रश्न उभा राहिला आहे वेगवेगळ्या या ठिकाणी बाटल्या गोळा करून चरितार्थ चालवणाऱ्या एका दाम्पत्याचा पाठमोरा फोटो सोशल मीडियावर आला होता त्यामुळे अशा लोकांच्या भावना रांगोळीद्वारे आपण मांडाव्यात ही कल्पना आपल्याला सुचल्याचे कलाकार राहुल कळंबटे यांनी सांगितले विघ्नहर्ता सर्वांना कोरोना वर मात करण्याचे बळ देईल असा विश्वास सर्वच भाविकांना आहे कळंबटे यांनी ही रांगोळी आपल्या किरण राठोड या सहकाऱ्यांच्या मदतीने अठरा तास मेहनत करून साकारले आहे कळंबटे यांच्या कलाकृतीचे कौतुक होत आहे
www.konkantody.com
