गुहागर समुद्र किनाऱ्यावरील जेटी तोडण्याच्या कामाला सुरुवात
गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील तीन समुद्र दर्शनी पाडल्यानंतर गुहागर समुद्रकिनाऱ्याची ओळख बनलेली जेटी तोडण्याच्या कामाला काल सुरवात झाली. सीआरझेड 1 मध्ये केलेले अनधिकृत बांधकामे तोडण्याचे आदेश हरित लवादाने दिले होते. या आदेशांच्या अंमलबजावणी अंतर्गत हे जेटी तोडण्याचे काम पतन विभागाच्या देखरेखीखाली सुरु आहे.जेटीचे बांधकाम क्रॉक्रीटमध्ये केलेले असल्याने ब्रेकर वापरुन फोडावे लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण जेटी तोडण्यास ५ ते ६ दिवसांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी लागणार आहे
www.konkantoday.com