कोरोनाचे संकट दुर करण्याचे गार्‍हाणे घालत व शासनाच्या नियमांचे पालन करीत लाडक्या बाप्पाला भावपुर्ण निरोप

खेड : बा विघ्नहर्ता जगावर आलेले कोरोनाचे संकट दुर कर आणि या वर्षीपेक्षा अधिक चांगली सेवा करून घ्यायला पुढच्या वर्षी लवकर ये असे गा-हाणे घालत देवाधी देव गणरायांना आज भावपुर्ण निरोप देण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर खेड तालुक्यात आज एकही विसर्जन मिरवणुक निघाली नाही त्यामुळे अनंत चुतर्थदशीचा जल्लोष कुठेही पहावयास मिळाला नाही.
यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने यंदाचा गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा करावा असे आदेश शासनाकडून देण्यात आले होते. या आदेशाचे पालन करत खेड मधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी अगदी साधेपणाने हा उत्सव साजरा केला. गणरायांच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत शहर किंवा ग्रामीण भागात कुठेही उत्सवाचा जल्लोष नव्हता.
शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्श तत्वांनुसार हा उत्सव साजरा केला जात होता. खेड तालुक्यात शिवसेना, मनसे, संघर्ष मित्र मंडळ भरणे, नातुवाडी प्रकल्प मित्र मंडळ, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आंबवली, वडार समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, टायटनचा राजा गणेशोत्सव मंडळ असे सात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत. दरवर्षी या मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अनंत चर्तुदशीच्या दिवशीचा जल्लोष काही वेगळाच असतो. सकाळी १० वाजता सुरु होणारी विसर्जनाची मिरवणुक रात्री उशीरापर्यंत सुरुच असते. गेल्या अनेक वर्षाची ही परंपरा आहे मात्र यंदाचे चित्र वेगळेच आहे. गेल्या अनेक वर्षाच्या परंपरेत यंदा प्रथमच खंड पडला आहे. यंदा ना ताशाची तडतड, ना फटाक्यांची आतषबाजी, ना बेंजों, ना ढोलपथक या स्थितीत गणरायांना विसर्जन घाटाकडे नेण्यात येत होते.
घरगुती गणेशमुर्तीचे विसर्जन खेड शहरातील कन्या शाळा, आणि महाडनाका येथे तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावात करण्यात आवाहन नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले होते. त्यानुसार घरगुती गणेश मुर्तीचे विसर्जन या कृत्रिम तलावात तर सार्वजनिक गणरायांचे विसर्जन जगबुडी येथील घाटावर करण्यात आले होते. या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाने आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. निर्माल्य जमा करण्यासाठी निर्माल्य कलश ठेवण्यात आला होता. विसर्जनादरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी या ठिकाणी जीवन रक्षक तसेच अग्नीशमन बंब तैनात ठेवण्यात आला होता. मात्र जगबुडी येथील गणेश घाटावर दरवर्षी प्रमाणे भक्तांचा जल्लोष पहावयास मिळत नव्हता.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button