आमदार शेखर निकम यांनी सामाजिक जबाबदारी ओळखून जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वाहनासाठी दिली पंचवीस हजार रुपयाची मदत
रत्नागिरी शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढी साठी आवश्यक वाहनाच्या दुरुस्तीसाठी सामाजिक जबाबदारी ओळखून आमदार शेखर निकम यांनी स्वतःकडील पंचवीस हजार रुपये तात्काळ उपलब्ध करून दिले रक्त पेढी साठी आवश्यक असणार्या रक्तसाठा करण्यासाठी या वाहनाचा उपयोग होत असतो मात्र हे वाहन नादुरुस्त झाले होते त्यामुळे बंद होते तसेच त्याचे टायर बदलणे आवश्यक होते ही गोष्ट आमदार निकम यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ यात लक्ष घालून शासकीय निधीचे वाट न पाहता स्वतःकडील तात्काळ पंचवीस हजार रुपये उपलब्ध करून दिले त्यामुळे हे वाहन आता दुरुस्त झाले आहे याबाबत निकम यांचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी आभार मानले आहेत
www.konkantoday.com