
मियावाकी तंत्राने जंगलनिर्माण;कोकणातील पहिला प्रकल्प चिपळूणमध्ये, अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते बुधवारी शुभारंभ
चिपळूण येथे पर्यटन क्षेत्रात
कार्यरत असलेल्या ग्लोबल चिपळूण टूरीझम संस्थेने पर्यटन विकासाबरोबरच वृक्ष लागवडीतून पर्यावरण समृद्ध करण्याचा विडा उचलला आहे. जपानमधील वनस्पती डॉ. अकिरा मियावाकी यांच्या धनपद्धतीच्या वृक्ष लागवडीचे मियावाकी फॉरेस्ट हे तंत्र वापरून संस्थेचे अध्यक्ष रामशेठ रेडीज यांच्या धामणवणे येथील डोंगरात वृक्ष लागवड करण्यात येत आहे. याचा शुभारंभ दि. २ सप्टेंबर रोजी सकाळी ११वा. नाम फाउंडेशनचे संस्थापक, प्रसिद्ध सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांचे हस्ते होणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने आज सोमवारी पत्रकार परिषदेत दिली गेली. या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून चिपळूण-संगमेश्वर विधानसभा आमदार शेखर निकम यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
www.konkantoday.com