भ्रष्ट व कामचुकारपणा करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांवर सरकार मोठी कारवाई करणार
केंद्र सरकारच्या विविध विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसंदर्भात केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. भ्रष्ट व कामचुकारपणा करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांवर सरकार मोठी कारवाई करणार असून, त्यांना सेवा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच निवृत्ती दिली जाणार आहे. केंद्रीय कार्मिक मंत्रालयानं यासंदर्भात सर्व विभागांना आदेश दिले आहेत. ३० वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिकांचा आढावा घेऊन भ्रष्ट व कामचुकार कर्मचाऱ्यांना जनहिताच्या दृष्टीनं आधीच त्यांना सेवानिवृत्त करण्यात यावं, असे आदेश केंद्र सरकारनं दिले आहेत.
www.konkantoday.com