धनगरवाड्यांच्या विकासासाठी तांडा वस्ती सुधार योजनेतून निधी द्या-आमदार योगेश कदम यांची शासनाकडे मागणी

खेड : दुर्गम भागात वसलेल्या धनगरवाड्यांना भौतीक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने तांडा वस्ती सुधारयोजनेतर्गत निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी खेड-दापोली मंडणगड विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
दापोली मतदार संघात येणारे दापोली, मंडणगड, आणि खेड हे तीन्ही तालुके शासनाने डोंगरी भाग तालुके म्हणून जाहीर केले आहेत. या तालुक्यांतील अतिशय दुर्गम भागात वस्ती करून राहणारा धनगर समाज आजही विकासापासून वंचीत आहे. विकासापासून वंचीत राहिलेल्या या धनगरवाड्यांना प्राधान्याने रस्ते, पाणी, वीज या भौतिक सुविधा पुरविणे आवश्यक असल्याने शासनाने तांडा वस्ती सुधार योजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार कदम यांनी केला आहे.
खेड तालुक्यातील दहिवली, वावे गायकरवाडी ते धनगरवाडी येथे रस्ता तयार करणे, किंजळेतर्फे नातू, वडगाव, माणी धनगरवाडी रस्त्यांचे डांबरीकरण, किंजळेतर्फे नातू कलकरायवाडी ते धनगरवाडी रस्ता तयार करणे, पुरे बुद्रुक धनगरवाडी येथे संरक्षक भिंत बांधणे, तुळशीखुर्द धनगरवाडी येथे पाण्याची टाकी बांधणे, तुळशी खुर्द धनगरवाडी रस्ता डांबरीकरण करणे, आपडे धनगरवाडी रस्ता डांबरीकरण करणे, याच धनगरवाडीसाठी पाण्याची टाकी आणि गावतळी बांधणे, तळे धनगरवाडी येथे सरंक्षक भिंत बांधणे, तिसंगी निकमवाडी ते धनगरवाडी रस्ता तयार करणे, घेरारसाळगड भराडे धनगरवाडी रस्ता तयार करणे, सवेणी दळवीवाडी ते धनगरवाडी रस्त्याच्या कॉजवेचे बांधकाम करणे, खवटी धनगरवाडी रस्त्यावरील मोरीचे काम करणे, सणघर, चाटव, आस्तान, धनगरवाडी रस्त्यांना मोऱ्या बांधणे, वाडी बेलदार धनगरवाडी रस्त्याला मोरी बांधणे, पुरे बुद्रुक धनगरवाडी रस्ता तयार करणे, शेल्डी धनगरवाडी रस्त्याचे डांबरीकरण करणे, लोटे तलारी धनगरवाडी रस्ता डांबरीकरण करणे, चिरणी धनगरवाडी येथे पाण्याची टाकी बांधणे, चिरणी सोमेश्वर धनगरवाडी येथे रस्ता तयार करणे ही काम या पत्रात सुचविण्यात आली असून यासाठी २ कोटी ७१ लाख रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे.
दापोली विधानसभा मतदार संघ हा डोंगराल मतदार संघ असल्याने विशेष बाब म्हणून धनगरवाड्यांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती शासनाकडे करण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button