
रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील अन्य जिल्ह्यात मुसळधार पावासाची शक्यता
रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील अन्य जिल्ह्यात मुसळधार पावासाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने कोकणातील सर्व किनारपट्टी भागात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.
दरम्यान, 30 ऑगस्ट रोजी कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रात ताशी 55 कि. मी. वेगाने वारे वाहतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असल्याने कोकणातील जिल्हा प्रशासनांनी मच्छीमारासह सगरात न जाण्याचा इशारा दिला आहे.
www.konkantoday.com