
निसर्गामुळे आलेल्या संकटाला दोन हात करताना हे हात थकत नाहीत
कोकण रेल्वेचा मार्ग सुरूवातीपासूनच खडतर होता कोकण रेल्वे धावली ती कोकणातल्या दऱ्याखोऱ्यांतून, मुळात कोकण रेल्वेची उभारणी व ठराविक मुदतीत हा प्रकल्प पूर्ण करणे हे आव्हानात्मक काम होते परंतु कोकण रेल्वे महामंडळाने हे काम सिद्धिस नेले
अर्थात कोकण रेल्वेचा खडतर मार्गाच्या उभारणीत देखील अनेक कामगार व अधिकाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले कोकण रेल्वे महामंडळातर्फे अशांची स्मृती दरवर्षी जागवून त्यांना स्मृतिस्तंभास समोर आदरांजली दिली जाते सुरुवातीला अनेक संकटाला कोकण रेल्वेला तोंड द्यावे लागले अनेकवेळा दरडी व माती रुळावर आल्याने अनेकवेळा वाहतूक ठप्प झाली किरकोळ अपघातापासून एकदा मोठा अपघातही झाला त्यातून कोकण रेल्वे सावरली कोकण रेल्वेच्या प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले गेले असे अपघात होऊ नये म्हणून बोगद्यासह ठिकठिकाणी दरडीखाली येऊ नयेत म्हणून लोखंडी जाळ्या व मार्गावर ठिकठिकाणी गस्ती सुरू केले याचा परिणाम म्हणूनच कोकण रेल्वेचा मार्ग सुरक्षित झाला तरीदेखील अनेक वेळेला निसर्गासमोर कोणाचे चालत नाही कोकण रेल्वेचा मार्गच मुळातून डोंगरखोऱ्यातून असल्याने दरड व दगडखाली येण्याचे प्रकार मधे मधे घडत असतात त्यामुळे काहीवेळा वाहतूक ठप्प होते वाहतूक ठप्प झाल्यावर साहजिकच प्रवाशांकडून नाराजीचे सूर ऐकू येतात ,नैसर्गिक परिस्थिती वेळा काहीवेळा गाड्या स्टेशनमध्ये तासंतास थांबवाव्या लागतात तेव्हा प्रवासी कोकण रेल्वेच्या नावाने ओरड करतात परंतु अशा प्रसंगी कोकण रेल्वेचे कर्मचारी युद्धपातळीवर काम करीत असतात नैसर्गिक आपत्तीमुळे आलेली संकटे दूर करण्यासाठी ते झटत असतात ही वाहतूक लवकरात लवकर सुरू होण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो आज पहाटेदेखील भोके जवळ दरड खाली आल्याने राजधानी एक्स्प्रेसचे इंजिन घसरले होते हे इंजिन रुळावर आणण्यासाठी व कोसळलेला बोल्डर दूर करण्यासाठी हे कर्मचारी कशा रीतीने काम करतात हे आपल्याला दिसतच आहे आत्तादेखील या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून हा मार्ग मोकळा करून दिला अशा प्रसंगी हा मार्ग सुरळीत करण्यासाठी काम करणार्या कोकण रेल्वे कर्मचार्याच्या व कोकण रेल्वे महामंडळाच्या पाठिशी आपण सर्वांनी उभे राहण्याची गरज असते हीच त्यांना खरोखरचे शाब्बासकी ठरु शकते
www.konkantoday.com