
रत्नागिरीतील दोन उद्योजकांनी केलेल्या मदतीमुळे पाय गमावलेल्या तरुणाला स्वतःच्या पायावर उभे राहता आले
रस्ते अपघातात संगमेश्वर तालुक्यातील तळेकांटे येथील तरुणाने एक पाय गमावला. घरची जबाबदारी खांद्यावर असताना पाय गमवावा लागल्याने कुटुंबाचा कणाच मोडला. मात्र या तरुणाच्या मदतीला धावून आले दोन उद्योजक महेंद्र गुंदेचा आणि सौरभ मलुष्टे. या तरुणाला कृत्रिम पाय बसवून देण्याची जबाबदारी या दोघांनी पार देखील पाडली.संगमेश्वर तालुक्यातील तळेकांटे येथील एकनाथ रेवाळे या तरुणाला. रस्ते अपघातात एक पाय गमवावा लागला.मात्र या तरुणाच्या मदतीसाठी सौरभ मलूष्टे आणि महेंद्र गुंदेचा धावले.
घरातील कुटुंब प्रमुख तरुणावर कोसळलेल्या या संकटातून त्याची सुटका करण्याचा निर्णय गुंदेचा आणि मलुष्टे यांनी घेतला. उपचारासाठी रेवाळे यांना तात्काळ हुबळी कर्नाटक येथील ऑल इंडिया जैन युथ फेडरेशन संचालित महावीर लिंब सेंटर येथे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
यानुसार रेवाळे यांना हुबळी येथील लिंब सेंटर मध्ये पाठवून त्यांना कृत्रिम पाय मोफत उपलब्ध करून देण्यात आला. हुबळी येथे जाताना एका पायावर आणि हातात कुबड्या घेऊन गेलेले अपघातग्रस्त एकनाथ रेवाळे येताना कृत्रिम पायाच्या सहाय्याने कुबड्या शिवाय चालू लागले.हुबळीतील अशोक कोठारी आणि रत्नागिरी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितिन ढेरे यांनी देखील या कामात मोलाचे सहकार्य केले. रत्नागिरी जिल्ह्यातील कुठल्याही अपंग व्यक्तीला कृत्रिम अवयव बद्दल मदत हवी असल्यास त्यांनी महेंद्र गुंदेचा व सौरभ मलुष्टे यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे
www.konkantoday.com