
जनतेच्या जीवाशी खेळणार्या ठेकेदाराला भर रस्त्यात चाबकाने झोडले पाहिजे – शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम ते लांजा पर्यंतचे १२० किमीच्या रस्त्यांची चाळण झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे महामार्गावर डबकी साचली असून या मार्गावरची वाहतूक धोकादायक बनली आहे. गेल्या ४ वर्षात महामार्गाचे १० टक्केही काम ठेकेदाराने केलेले नाही. जुन्या रस्त्याचे मेंटेनन्स ठेवून महामार्गाचे काम करायचे आहे. त्याचे सरकार पैसे देणार आहे. मग संबंधित खात्याचे अधिकारी करतायत काय, कोणत्या क्वॉलिटीचे काम चाललय, यावर लक्ष कोण ठेवणार, आपल्या सोयीनुसार काम करणार्या आणि जनतेच्या जीवाशी खेळणार्या ठेकेदाराला भर रस्त्यात चाबकाने झोडले पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी व्यक्त केली.
www.konkantoday.com




