
केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी अनलॉक-4 साठीची नियमावली जाहीर केली
केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी अनलॉक-4 साठीची नियमावली जाहीर करताना लॉकडाऊनमध्ये आणखी शिथिलता आणली. त्या नियमावलीनुसार देशात 7 सप्टेंबरपासून मेट्रो टप्प्याटप्प्याने धावू शकणार आहे. त्याशिवाय, सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि मेळावे आयोजित करण्याला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार, संबंधित मेळावे आणि कार्यक्रम 21 सप्टेंबरपासून होऊ शकतील. मात्र, त्यामध्ये 100 व्यक्तीच सहभागी होऊ शकतील.विद्यार्थ्यांसाठी शाळा, महाविद्यालये, इतर शैक्षणिक संस्था आणि कोचिंग क्लासेस 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. मात्र, 9 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी काही सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, संबंधित वर्गांमधील विद्यार्थी स्वेच्छेने शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊ शकतील. मात्र, त्या शाळा आणि महाविद्यालये प्रतिबंधित क्षेत्रांबाहेर असणे गरजेचे आहे.
त्याशिवाय, विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांची लेखी परवानगी घ्यावी लागेल. ऑनलाईन वर्ग किंवा टेलिकाउन्सिलिंग आणि संबंधित कामकाजासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची सरकारे 50 टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळांमध्ये बोलावण्याची परवानगी देऊ शकतीलराजकीय, सामाजिक आणि इतर कार्यक्रम, मेळाव्यांना उपस्थित राहणाऱ्यांना फेस मास्क अनिवार्य असेल. त्यांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागेल. त्या कार्यक्रम, मेळाव्यांवेळी थर्मल स्कॅनिंग, हात धुण्याची आणि सॅनिटायझरची व्यवस्था करावी लागेल.
लॉकडाऊनबाबत राज्यांवर निर्बंध प्रतिबंधित क्षेत्रांबाहेर लॉकडाऊन लागू करण्याबाबत राज्यांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. स्थानिक जाहीर करण्यापूर्वी राज्यांना केंद्र सरकारशी सल्लामसलत करावी लागणार आहे.
www.konkantoday.com