
अंतिम वर्षाच्या परीक्षा बाबत नेमलेल्या समितीची आज बैठक
विद्यार्थ्यांना मानसिक त्रास होणार नाही अशारीतीने सहज आणि सुलभ पद्धतीने अंतिम वर्षांच्या परीक्षा कशा आणि कधी घेता येतील यासाठी कुलगुरूंची समिती गठित करण्यात आली आहे. आज, रविवारी सकाळी ११ वाजता या समितीची बैठक होणार आहे. समितीने अहवाल सादर के ल्यावर राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून परीक्षा कधी घ्यायच्या याचा निर्णय घेतला जाईल, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
www.konkantoday.com