विसाव्यावर्षी वैमानिक झालेल्या निधी मंगेश भोसले हिचे चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी केले कौतुक
वयाच्या अवघ्या विसाव्यावर्षी वैमानिक झालेल्या निधी मंगेश भोसले हिचे चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी त्यांच्या घरी जाऊन खास कौतुक केले. निधी तुझा आम्हाला अभिमान आहे, तुझ्या या कर्तृत्वातून इतर मुली प्रेरणा घेतील व तुझ्याप्रमाणे तालुक्याचे नाव मोठे करतील, असा विश्वास आ. निकम यांनी व्यक्त केला. या वेळी शहराध्यक्ष मिलिंद कापडी, तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, नगरसेवक परिमल भोसले, संजय कदम, निधीचे वडील मंगेश भोसले, जय भोसले, किसन चिपळूणकर, सुधीर पानकर व अन्य उपस्थित होते.
www.konkantoday.com