
मिरजोळीत लोकवस्तीत बिबट्याचे दर्शन ग्रामस्थांच्या भीतीचे वातावरण
चिपळूण तालुक्यातील मिरजोळी गावात गेल्या काही दिवसांपासून भरवस्तीतही बिबट्याचे दर्शन होवू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरापासून काही अंतरावर वसलेल्या मिरजोळी गावाच्या सीमेला लागून जंगलभाग आहे. माळरानावर ग्रामस्थांच्या जनावरांचे गोठे आहेत. गेल्या काही वर्षात त्या परिसरात बिबट्याने दहशत माजविली होती. काही गुरेही या बिबट्याने मारली होती. आता अधूनमधून ग्रामस्थांना बिबट्या दिसत आहे. याशिवाय लोकवस्तीच्या ठिकाणीही या बिबट्याच्या पंजाचे ठसे दिसून आले आहेत.
www.konkantoday.com