गुहागर बोर्या येथे गणपती विसर्जन करताना बुडालेल्या त्या दोघांचे मृतदेह मिळाले
गुहागर- गुहागर तालुक्यातील बोर्या याठिकाणी गौरी- गणपती विसर्जन करताना समुद्रात बुडालेल्या वैभव देवाळे आणि अनिकेत हळ्ये दोन्ही तरुणांचे मृतदेह काल बोऱ्या समुद्रकिनारीच आढळून आले.
गुहागर तालुक्यातील अडूर भाटलेवाडी येथील ग्रामस्थ गौरी गणपती विसर्जनासाठी बोऱ्या समुद्रकिनारी गेली होती. त्यावेळी वैभव देवाळे आणि अनिकेत हळ्ये हे दोन तरुण अन्य तिघांसोबत मोठी गणेशमूर्ती घेवून किनाऱ्यावरील जेटीवर गेले होते. गणेशमुर्ती विसर्जन करताना मोठी लाट आली. या लाटेत पाचही युवक तोल जावून समुद्रात पडले. त्यापैकी तिघांनी पोहत समुद्रकिनारा गाठला. मात्र वैभव आणि अनिकेतला पोहता येत नसल्याने ते समुद्रात बुडाले होते
www.konkantoday.com