केंद्रीय गृह मंत्रालयाचे सायबर सुरक्षा आणि जागरूकतेसाठी ‘सायबर दोस्त’ नावाचे ट्विटर
बँक खातेधारकांच्या फसवणुकीचं, ऑनलाईन गुन्ह्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्याचा फटका अनेकांना बसतो. ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारनं महत्त्वाची नियमावली आणली आहे. त्यामुळे ग्राहकांना स्वत:च्या बँक खात्याचं संरक्षण करता येईल. केंद्रीय गृह मंत्रालयानं सायबर सुरक्षा आणि जागरूकतेसाठी ‘सायबर दोस्त’ नावाच्या ट्विटर हँडलवरून ग्राहकांना विविध सूचना देण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकांनी बँकेच्या कामासाठी दोन ई-मेल अकाऊंट्स वापरण्याचा सल्ला सायबर दोस्तनं दिला आहे. ग्राहकांनी एका ई-मेल खात्याचा वापर संवाद साधण्यासाठी, तर दुसऱ्या खात्याचा वापर व्यवहारांसाठी करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
www.konkantoday.com