
जिल्ह्यात विधानसभेच्या दोन जागांसाठी आग्रही
जिल्ह्यातील ५ विधानसभा मतदार संघापैकी २ विधानसभेच्या जागांसाठी आग्रही असून या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार यावेत, यासाठी आग्रही आहोत. महायुतीतून दोन मतदार संघ राष्ट्रवादीला मिळावेत यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळासमवेत भेट घेवून मागणी करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी दिली.ऑक्टोबर महिन्यात राज्यातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदार संघावर दावे करत आहे. त्याच पद्धतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) पुढे सरसावला आहे. जिल्ह्यातील चिपळूण मतदार संघातून विद्यमान आमदार शेखर निकम यांनाच पुन्हा उमेदवारी द्यावी तसेच राजापूर व गुहागर या दोन मतदार संघापैकी एक मतदार संघ महायुतीतून राष्ट्रवादीला मिळावा अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे.www.konkantoday.com