
महेश मांजरेकर यांना खंडणीसाठी अबु सालेमच्या नावाने धमकी देणाऱ्या व्यक्तीला खंडणी विरोधी पथकाने खेड रत्नागिरी मधून अटक केले
हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील नामांकित दिग्दर्शक आणि कलाकार महेश मांजरेकर यांना खंडणीसाठी अबु सालेमच्या नावाने धमकी देणाऱ्या व्यक्तीला खंडणी विरोधी पथकाने खेड रत्नागिरी मधून अटक केली आहे. धमकी देणाऱ्याचं नाव तुळसकर असून तो रत्नागिरी जिल्ह्यातील रहाणारा आहे.
23 ऑगस्टला रात्रीच्या वेळेस महेश मांजरेकर यांच्या मोबाईल वर एक मॅसेज आला ज्याच्या मध्ये एका अज्ञात व्यक्तीकडून मेसेजद्वारे 35 कोटी रुपये खंडणी मागितली. स्वतःला अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचा हस्तक सांगून हे पैसे पाठवण्याचे सांगण्यात आलं. 23 ते 25 ऑगस्ट दरम्यान या व्यक्तीकडून वारंवार महेश मांजरेकर यांना खंडणीसाठी मॅसेज येऊ लागले.26 ऑगस्टला दादर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आणि तो गुन्हा खंडणी विरोधी पथकाकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला. याच्या तपासासाठी खंडणी विरोधी पथकाकडून दोन पोलीस पथक तयार करण्यात आली आणि त्यांनी कल्याण आणि ठाणे या ठिकाणी शोध सुरू केला. आरोपी तुळसकर आपला मोबाईल वारंवार बंद करत होता. ज्यामुळे पोलिसांना त्याचा सुगावा लागत नव्हता. गुप्त बातमी दाराकडून माहिती घेऊन आणि तांत्रिक बाबींचा बारकाईने अभ्यास करून हे मेसेज खेड रत्नागिरी वरून येत असल्याचं कळलं आणि पथक खेड रत्नागिरीपर्यंत पोहोचलं तुळसकर याला 2 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे
www.konkantoday.com