सारस्वत बँकेकडून एक कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द
मुंबई, दि. २७ :- मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सारस्वत बँकेकडून एक कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. या निधीचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आज येथे सुपूर्द करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी धनादेश सुपूर्द केला. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच बँकेचे उपाध्यक्ष एस. के. साखळकर, संचालक के.व्ही. रांगणेकर, व्यवस्थापकीय संचालक श्रीमती एस. एम. सैंदाणे, मुख्य व्यवस्थापक अजय जैन आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com