रत्नागिरी शहरानजीकच्या जे.के फाइल्स येथे पादचारी महिलेचा अज्ञात वाहनाने उडवल्याने मृत्यू
रत्नागिरी शहरानजीकच्या जे.के फाइल्स येथील रस्त्यावर अज्ञात पादचारी महिलेला अज्ञात वाहनाने उडवल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी पहाटे घडली
ही बाब तेथील नागरिकांना समजताच त्यांनी शहर पोलिसांना खबर दिली.पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला या महिलेची ओळख पटलेली नाही.दरम्यान अज्ञात वाहन चालकाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
www.konkantoday.com