
जिल्हा परिषदेतील सेना पदाधिकार्यांच्या मुदतवाढीवर विचार नाही
रत्नागिरी जिल्हा परिषदेतील शिवसेना पदाधिकार्यांच्या मुदतवाढीवर विचार हाेणार नसल्याचे कळत आहे पंचायत समितीमधील शिवसेनेचे सभापती, उपसभापती यांना देखील कोणत्याही क्षणी आपल्या पदाचे राजीनामे द्यावे लागणार आहेत. शिवसेनेने राजकीय बदलाची प्रक्रिया सुरू केली आहे.
कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत ग्रामीण विकासाची कामे करणे शक्य न झाल्याने जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी मुदतवाढीची मागणी संघटनेकडे केली होती. ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू असल्याने या मागणीबाबत सेना पदाधिकार्यांनी कोणतेही राजकीय भाष्य केलेले नव्हते. शिवसेनेचे सचिव, खासदार विनायक राऊत यांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील पदाधिकार्यांचे राजीनामे लवकरच घेणार असल्याचे वक्तव्य करून मुदतवाढीच्या प्रतिक्षेत असलेल्या पदाधिकार्यांचा भ्रमनिरास केला आहे.रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी देखील या प्रकरणी सध्याच्या पदाधिकाऱ्यांना विशेष दिलासा दिलेला नाही
www.konkantoday.com