देवरुखमध्ये गणेश विसर्जन दरम्यान बुडणाऱ्या दोघांना जीव रक्षकांनी वाचविले
देवरुखमध्ये गणेश विसर्जन दरम्यान बुडणाऱ्या दोघांचे प्राण नगरपंचायतचे कर्मचारी असलेले दोन जीवरक्षक तरुणांनी स्थानिकच्या मदतीने वाचविले.
काल दुपारी बागवाडी येथील दोन तरुण येथील सप्तलिंगी नदीत गणपती विसर्जन करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागले. ही गोष्ट विसर्जन घाटावर असलेल्या नगरपंचायतच्या सुरक्षा रक्षक सुभाष भिवराव कदम आणि आतिष संजय कांबळे यांच्या लक्षात आली. क्षणांचाही विलंब न लावता लाईफ जॅकेट सहित असलेल्या आतिष याने पाण्यात उडी घेतली. सुभाष कदम याने हातात असलेल्या रोपला बांधलेला बोया बुडणाऱ्याच्या दिशेने फेकून त्यास वाचविले .
www.konkantoday.com