ग्रामस्थांनी सतर्कता दाखविल्याने व सर्पमित्र किशोर निवळकर यांच्यामुळे त्या पाच बिनविषारी सापांना मिळाले जीवदान

दापोली- ग्रामस्थांनी सतर्कता दाखविल्याने व सर्पमित्र किशोर निवळकर यांच्यामुळे त्या पाच बिनविषारी सापांना मिळाले जीवदान मिळाले आहे २७ ऑगस्ट…वेळ सकाळी दहा वा.सुमारास…ठिकाण जालगाव कुंभार वाडी…एक नव्हे तर तब्बल पाच सापाची पिल्ले…मात्र ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत तात्काळ सर्पमित्र किशोर निवळकर यांना फोन केला बोलवून घेतले, निवळकर यांनीही तात्काळ धाव घेत दापोली शहराजवळ जालगाव कुंभार वाडी येथे एक नव्हे तर तब्बल पाच बिनविषारी नानेटी जातीच्या सापाला जिवंत पकडून त्यांना वाचवले आहे. अनेकजण साप म्हटले की मारतात मात्र अशा स्वरूपाचे हा बिनविषारी साप आहे. ग्रामीण भाषेत त्यांना एका मागोमाग येणाऱ्या मण्यार असे म्हणतात मात्र यांचे शास्त्रीय नाव ‘नानेटी’ आहे. त्याचे खाद्य बेडुक सरडे,उंदीर घुशी हे आहे म्हणूनच हा यांचा वावर घर परसावात असावा. हरणटोळ हा हिरव्या रंगाचा निमविषारी साप आहे. त्याचे झाडावरील प्राणी हे आहे मात्र ग्रामीण भाषेत हरणटोळ हिरव्या रंगाच्या सापाला नानेटी म्हणतात अशी माहिती जालगाव कुंभार वाडी परिसरात राहणारे सर्पमित्र किशोर निवळकर यांनी दिली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button