कोट्यावधी रुपये थकविणार्या बीएसएनएलविरोधात जागामालकांची ग्राहक पंचायतीकडे तक्रार
भारत संचार निगम लिमिटेडने कोट्यावधी रुपयांचे भाडे थकवल्याने टॉवर व एक्स्चेंजसाठी जागा देणारे जागामालक मेटाकुटीला आले आहेत. गेली दीड-दोन वर्षे बीएसएनएलने हे भाडे थकविले आहे.
बीएसएनएलची रत्नागिरी जिल्हयात सुमारे ४०० टॉवर व एक्स्चेंज आहेत. या सर्व जागा भाडेतत्वावर बीएसएनएलकडून घेण्यात आल्या असून प्रतीमहा पाच ते सात हजार रुपये भाडे बीएसएनएलकडून जागा मालकाला देण्यात येते.
खालावलेली आर्थिक परिस्थिती आणि कर्मचार्यांची वावना अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या बीएसएनएलने भाड्याने घेतलेल्या जागा मालकांकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. प्रत्येकी लाखो रुपयांचे भाडे थकवल्याने संबंधित जागा मालकांनी बीएसएनएलकडे पैशासाठी तगादा लावला. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर एका जागामालकाने ग्राहक पंचायतीच्या मार्गदर्शनाखाली बीएसएनएलच्या दिल्ली येथील कार्यालयाला कायदेशीर नोटीस बजावताच १५ दिवसांच्या आत संबंधित मालकाच्या खात्यात थकीत रक्कम जमा करण्यात आली. आता उर्वरित ग्राहकही ग्राहक पंचायतीकडे धाव घेणार आहेत
www.konkantoday.com